लोकमान्य टिळक
आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, आदरणीय व्यासपीठ, गुरुजनवर्ग आणि माझे सर्व मित्र मैत्रिणींनो, आज आपण 1 ऑगस्ट लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त जमलेलो आहोत. टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांचे खरे नाव 'केशव' होते; पण सर्वजण लाडाने त्यांना बाळ म्हणत. बाळ लहानपणापासूनच खूप हुशार होता. संस्कृत व गणित हे त्यांचे आवडते विषय होते.
एकदा टिळकांचे वडील 'बाणभट्टाची कादंबरी' हे संस्कृत पुस्तक वाचत होते. बाळाला ते हवे होते. त्याने ते मागितले. वडिलांना वाटले एवढ्याशा १० वर्षाच्या मुलाला हे पुस्तक कसे वाचता येणार? ते म्हणाले, "पुस्तक मिळेल, पण त्याआधी एक गणित सोडून दाखवावे लागेल." बाळ हो म्हणाला. वडिलांनी घातलेले अवघड गणित बाळाने खूप विचार करून सोडवले. वडील खुश झाले. त्यांनी त्याला शाबासकी दिली व पुस्तकही दिले. हाच बाळ पुढे खूप मोठा झाला. देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले. 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच' असे त्यांनी इंग्रजांना ठणकावून सांगितले. लोकांनी त्यांना 'लोकमान्य' ही पदवी दिली. ब्रिटिश सरकारने चिडून त्यांना मंडालेच्या तुरुंगात ठेवले. तुरुंगात असतानाच त्यांनी 'गीतारहस्य' हा महान ग्रंथ लिहिला. तुरुंगातून सुटल्यानंतरही त्यांनी आपले स्वातंत्र्यासाठीचे प्रयत्न चालूच ठेवले; परंतु 1 ऑगस्ट 1920 रोजी त्यांना मृत्यूने ओढून नेले. सर्व भारतीय शोक सागरात बुडाले. ते गेले तरी देखील त्यांनी सुरू केलेले स्वातंत्र्य चळवळ अखंड चालू राहिली आणि अखेर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. अशा या थोर नेत्यास माझे कोटी कोटी प्रणाम! तात्पर्य: बाणभट्टाची कादंबरी पुस्तकासाठी अवघड गणित सोडविणारा बाळ चा जिद्दी स्वभावच त्याला लोकमान्य बनवू शकला जय हिंद !! महत्वाचे: तर मित्रांनो, “लोकमान्य टिळक | छोट्यांची छोटी भाषणं” हे मराठी भाषण आवडले असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका. या भाषणाबद्दल काही मुद्दे असतील तर आम्हाला नक्की पाठवा. ई-मेल – grammargurujistudy@gmail.com वरील भाषणामध्ये काही लिहायचं राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.