आदरणीय मुख्याध्यापक आणि माझे सर्व आदर्श शिक्षकांना माझा प्रणाम,
माझे नाव ........ आहे आणि मी इ.३ री चा विद्यार्थी आहे. मी आज येथे पूज्य साने गुरुजींचे भाषण देण्यासाठी उपस्थित आहे. मला माहित आहे की आपणा सर्वांना पूज्य साने गुरुजींबद्दल माहिती असेल परंतु आज मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगेन ज्या तुम्हाला प्रेरणा देतील.
खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे
जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित
तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे!
तुम्ही 'श्यामची आई' या पुस्तकाचं नाव ऐकलं असेल. हे पुस्तक ज्यांनी लिहिलं तेच हे साने गुरुजी. त्यांचं संपूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने. त्यांचा जन्म कोकणात पालगड या दापोली तालुक्यातील गावी झाला तो दिवस होता 24 डिसेंबर 1899 चा. मुलांनो, साने गुरुजी हे अतिशय गरीब परिस्थितीत वाढले. त्यांनी एम. ए. पर्यंतचे शिक्षण स्वावलंबाने पूर्ण केले. पुढे काही दिवस अंमळनेर येथे एका हायस्कूलमध्ये त्यांनी नोकरी केली. पण पुढे 1930 पासून त्यांनी आपले सारे आयुष्य राष्ट्रकार्यासाठी समर्पित केले.
ते उत्तम वक्ते होते. अनेक विषयांवर त्यांचा अभ्यास होता. साने गुरुजींचा स्वभाव अतिशय प्रेमळ होता. त्यामुळे ते विद्यार्थ्यांचे अतिशय लाडके होते. ते आपल्या आईवर खूप प्रेम करीत. आपल्या अनुभवाच्या आधारे त्यांनी लिहिलेले 'श्यामची आई' हे पुस्तक खूपच गाजले. त्यावर चित्रपटही निघाला. त्यांचा 'सुंदर पत्रे' हा पत्रसंग्रह तर मुलांवर चांगले संस्कार करणारा आहे. तो मुलांनी अवश्य वाचावा. साने गुरुजी अस्पृश्यतेविरुद्ध लढले. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेऊन कारावास भोगला. आपल्या लिखाणाच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन केले म्हणून तर साने गुरुजींचे नाव आजही सर्वजण घेतात. त्यांच्या स्मृतीस माझे विनम्र अभिवादन
तात्पर्य: आई हे सर्वश्रेष्ठ दैवत आहे असा संस्कार साने गुरुजींनी आपल्या जगण्यातून दिला.
जय हिंद!!
महत्वाचे: तर मित्रांनो, “पूज्य साने गुरुजी भाषण | छोट्यांची छोटी भाषणं" हे मराठी भाषण आवडले असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका. या भाषणाबद्दल काही मुद्दे असतील तर आम्हाला नक्की पाठवा. ई-मेल – grammargurujistudy@gmail.com
वरील भाषणामध्ये काही लिहायचं राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.