लोकांचे लाडके चाचा नेहरू
आदरणीय मुख्याध्यापक आणि माझे सर्व आदर्श शिक्षकांना माझा प्रणाम,
माझे नाव ........ आहे आणि मी इ.३ री चा विद्यार्थी आहे. मी आज येथे चाचा नेहरूंबद्दल भाषण देण्यासाठी उपस्थित आहे. मला माहित आहे की आपणा सर्वांना चाचा नेहरूंबद्दल माहिती असेल परंतु आज मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगेन ज्या तुम्हाला प्रेरणा देतील.
बालदिन म्हणजे आम्हा मुलांचा दिवस. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांचा वाढदिवस. 14 नोव्हेंबर हा त्यांचा जन्मदिवस. त्यांचे संपूर्ण नाव जवाहरलाल मोतीलाल नेहरू. नेहरूंचे वडील प्रसिद्ध वकील होते. ते खूप श्रीमंत होते. जवाहर एखाद्या राजकुमारासारखा राहत असे.
इतर महत्वाचे भाषणं | |
---|---|
पूज्य साने गुरुजी मराठीत भाषण | छोट्यांची छोटी भाषणं👉 | येथे क्लिक करा. |
लोकमान्य टिळक मराठीत भाषण | छोट्यांची छोटी भाषणं 👉 | येथे क्लिक करा. |
दसरा सण मराठीत भाषण | छोट्यांची छोटी भाषणं👉 | येथे क्लिक करा. |
जवाहरचे प्राथमिक शिक्षण घरीच झाले व पुढचे शिक्षण इंग्लंडमध्ये झाले. पुढे उच्च शिक्षणही त्यांनी पूर्ण केले. ते बॅरिस्टर होऊन परतले. त्यांच्या मनात स्वातंत्र्याचे विचार होते. राजकारण करावेसे वाटत होते. त्यामुळे त्यांनी वकिलीचा व्यवसाय फार काळ केला नाही. त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. गोखले, टिळक, गांधी यांच्या प्रभावामुळे ते भारावून गेले. ते स्वातंत्र्य चळवळीत जोमाने काम करू लागले. ते फक्त चार तासात झोप घेत. घरात खूप कमी वेळ थांबत. त्यांच्या देशभक्तीमुळे इंग्रजांनी त्यांना अनेकदा शिक्षा केली, पण नेहरूंनी आपले कार्य थांबवले नाही. पुढे आपला भारत देश स्वातंत्र झाला. त्यावेळी आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान होण्याचा मान त्यांनी मिळविला. भारताचे महामंत्री म्हणून त्यांनी सतरा वर्षे काम पाहिले. आपल्या देशाची औद्योगिक तसेच वैज्ञानिक क्षेत्रात प्रगती होण्याच्या दृष्टीने त्यांनी खूप परिश्रम घेतले. पंडित नेहरू हे शांतता प्रिय होते. जगात सर्वत्र त्यांना मान होता. शांतिदूत म्हणून आंतरराष्ट्रीय राजकारणात ते ओळखले जात होते. अनेक वर्षे गुलामगिरीत राहिल्यामुळे भारताची अंतर्गत सर्व व्यवस्था नव्याने उभी करायची होती, नेहरूंनी हे काम यशस्वीपणे केले. नेहरू उत्तम लेखक होते. त्यांचे आत्मचरित्र खूपच गाजले. डिस्कवरी ऑफ इंडिया हे त्यांचे पुस्तकही खूप माहिती पूर्ण आहे. नेहरू मुलांवर खूप प्रेम करील. ते मुलांचे लाडके चाचा होते. म्हणूनच त्यांचा वाढदिवस हा बालदिन म्हणून ओळखला जाऊ लागला. त्यांच्या थोर स्मृति माझे विनम्र अभिवादन.
तात्पर्य: युद्धपेक्षा औद्योगिक विकास व शांततेचा प्रसार यावर पंडित नेहरूंचा अधिक भर होता.
जय हिंद!!
महत्वाचे: तर मित्रांनो, “पंडित जवाहरलाल नेहरू | छोट्यांची छोटी भाषणं" हे मराठी भाषण आवडले असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका. या भाषणाबद्दल काही मुद्दे असतील तर आम्हाला नक्की पाठवा. ई-मेल – grammargurujistudy@gmail.com
वरील भाषणामध्ये काही लिहायचं राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.