'दसरा सण मोठा- नाही आनंदाला तोटा' असा हा दसरा म्हणजेच विजयादशमी. आश्विन शुद्ध दशमी म्हणजेच हा दिवस. हिंदू शास्त्राप्रमाणे प्रमुख साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त मानला जातो.
रामायणातील कथेनुसार रामाने रावणाचा वध करून लंकेवर विजय मिळविला म्हणून हा दिवस आनंदोत्सवाचा. या दिवशी आजही अनेक ठिकाणी गावाच्या सीमेवर रावणवधाचा प्रतीकात्मक कार्यक्रम करतात.
पांडवांना द्युतात हार खाल्ल्याने 12 वर्षे वनवास व 1 वर्ष अज्ञातवास भोगावा लागला. हा अज्ञातवास संपवून पांडव प्रकट झाले व त्यांनी शमी वृक्षावर ठेवलेली आपली शस्त्रे धारण केली, तोही दिवस आजचाच.
इतर महत्वाचे भाषणं | |
---|---|
पूज्य साने गुरुजी मराठीत भाषण | छोट्यांची छोटी भाषणं👉 | येथे क्लिक करा. |
पंडित जवाहरलाल नेहरू मराठीत भाषण | छोट्यांची छोटी भाषणं👉 | येथे क्लिक करा. |
लोकमान्य टिळक मराठीत भाषण | छोट्यांची छोटी भाषणं👉 | येथे क्लिक करा. |
या दिवशी सोने लुटायचे असते. सीमोल्लंघन करायचे असते. याचे कारण असे, की पावसाळा संपलेला असे; त्यामुळे युद्धाला बाहेर पडण्यास अनुकूल कालावधी असल्याने पूर्वी राजे लोक या दिवशी सीमोल्लंघन करीत असत. फार पूर्वी वरतंतू ऋषींचा शिष्य कौत्स याला गुरुदक्षिणा देण्यासाठी 14 कोटी सुवर्ण मोहरा हव्या होत्या. त्या मिळाव्यात म्हणून तो दानशूर अशा रघु राजाकडे आला. पण रघुने मोठा यज्ञ करून सर्व संपत्तीचे दान नुकतेच केले होते. आता तो मोहरा कसा देणार? पण कौत्साला रिकामे माघारी पाठविणेही योग्य नाही. शेवटी रघु राजाने कुबेरावर स्वारी करायची ठरविले, पण रघुच्या पराक्रमाची ओळख कुबेराला होती. त्याने त्या रात्रीच रघुच्या नगरीवर सुवर्ण मोहरांचाच पाऊस पाडला. त्यावेळी या मोहरा शमीच्या, आपट्याच्या झाडावर पडल्या. कौत्साने त्यातल्या 14 कोटीच मोहरा फक्त घेतल्या. त्याला जास्त नको होत्या, तर रघु राजा म्हणाला, "मला तरी या काय करायच्या?" म्हणून त्याने त्या सर्व मोहरा लुटून टाकल्या. तेव्हापासून या दिवशी म्हणजेच विजयादशमीस सोने म्हणून शमी किंवा आपट्याची पाने लुटतात. परस्परांना देतात.
अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होणाऱ्या दुर्गा महोत्सवाची समाप्ती याच दिवशी असते. देवीचा हा नवरात्रोत्सव अनेक ठिकाणी सार्वजनिक स्वरूपात साजरा करतात. याच वेळी शारदोत्सव साजरा करून देवी सरस्वतीचेही पूजन करतात. दसऱ्याच्या आदल्या दिवशी शस्त्रपूजनाची परंपराही रूढ आहे. अशा या विजयादशमी उत्सवातून आपण जीवनात विजयी होण्यासाठी प्रेरणा घेऊया!
तात्पर्य: कौत्स आणि राजा रघु यांचा आदर्श घेऊन आवश्यक तेवढेच स्वतः जवळ ठेवा. बाकीचे इतरांनाही खर्च करा.
|| जय हिंद ||
महत्वाचे: तर मित्रांनो, “दसरा सण | छोट्यांची छोटी भाषणं” हे मराठी भाषण आवडले असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका. या भाषणाबद्दल काही मुद्दे असतील तर आम्हाला नक्की पाठवा. ई-मेल – grammargurujistudy@gmail.com
वरील भाषणामध्ये काही लिहायचं राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.