Nanded Police Bharti 2022 | Apply Now
नांदेड पोलीस भरती 2022
नांदेड पोलीस भरती 2022: पोलीस विभाग नांदेड विभागामार्फत 185 रिक्त पोलीस कॉन्स्टेबल (शिपाई), पोलीस ड्रायव्हर (चालक) पदे भरण्यासाठी भरती अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होत आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच अपडेट केली जाईल. policerecruitment2022.mahait.org या पोर्टलद्वारे अर्ज करा. नांदेड पोलीस विभागाची अधिकृत वेबसाईट nandedpolice.gov.in आहे. अधिक तपशील खाली दिले आहेत
नांदेड पोलीस विभाग अंतर्गत पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक पदांच्या एकूण 185 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या पैकी पोलीस शिपाई पदांच्या 155 जागा आहेत, तसेच चालक (ड्रायव्हर) पदाच्या 30 जागा आहेत. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2022 आहे.. तसेच पोलीस भरती २०२२ साठी लागणारी महत्वाचे डॉक्युमेंट्स तयार या लिंक वर दिलेली आहेत आणि परीक्षा पद्धती आणि निवड प्रक्रिया या बद्दल माहिती या लिंक वर उपलब्ध आहे.
पोलीस शिपाई पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता, शारिरीक पात्रता, आवश्यक असलेली प्रमाणपत्रे / कागदपत्रे, सामाजिक व समांतर आरक्षणाबाबची माहिती, परीक्षा शुल्क, आवेदन अर्ज सादर करण्याबाबतची माहिती, अर्ज सादर करण्याचा दिनांक व वेळ आणि उमेदवारांसाठी सविस्तर सूचना policerecruitment2022.mahait.org या संकेतस्थळावर दिलेल्या सविस्तर जाहिरातीमध्ये उपलब्ध आहेत. सदरहू जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून, समजून घ्यावी. तसेच, सामाजिक, समांतर आरक्षण व अनाथांकरीता उपलब्ध पदांच्या 1% आरक्षित जागा विचारात घेऊन रिक्त पदांबाबतची खातरजमा करावी व त्यानंतरच उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज सादर करावेत.
पदाचे नाव – पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक
पद संख्या – 185 जागा
शैक्षणिक पात्रता – 12th Pass (मूळ जाहिरात वाचावी)
नोकरी ठिकाण – नांदेड
वयोमर्यादा –
खुला वर्ग:- 18 ते 28 वर्षे
मागासवर्गीय:-18 ते 33 वर्षे
अर्ज शुल्क –
खुला प्रवर्ग: रु. 450 /-
मागास प्रवर्ग: रु. 350 /-
अर्ज पद्धती – ऑनलाइन
अर्ज सुरु होण्याची तारीख – 3 नोव्हेंबर 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2022
अधिकृत वेबसाईट – nandedpolice.gov.in
Educational Qualification For Nanded Police Bharti 2022
पोलीस शिपाई: 12th should be passed from its respective boards. {महाराष्ट्र माध्यामिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम, 1965(सन 1965 चा महा.अधिनियम 41) अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) किंवा शासनाने या परीक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, (राष्ट्रीय मुक्त विद्यालय, नवी दिल्ली यांची सिनीयर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएसई बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा ह्या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 12 वी इयत्तेच्या परीक्षेशी समकक्ष आहेत)
पोलीस शिपाई चालक: 12th should be passed from its respective boards. {महाराष्ट्र माध्यामिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम, 1965(सन 1965 चा महा.अधिनियम 41) अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) किंवा शासनाने या परीक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, (राष्ट्रीय मुक्त विद्यालय, नवी दिल्ली यांची सिनीयर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएसई बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा ह्या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 12 वी इयत्तेच्या परीक्षेशी समकक्ष आहेत}.
How to Apply For Nanded Police Jobs 2022
1) या भरतीकरिता अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे
2) अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3) अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत अपलोड करावी.
4) देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
5) अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
6) अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2022 आहे.
Nanded Recruitment – Selection Process
1) शारीरिक चाचणी,
2) लेखी परीक्षा,
3) चारित्र्य प्रमाणपत्राची पडताळणी,
4) वैद्यकीय चाचणी इ.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या ब्लॉगला वेळोवेळी भेट देत राहावी.