Maharashtra Police Bharti 2022 Syllabus PDF Download
आपण या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस भरती २०२२ साठी आवश्यक महत्वाच्या गोष्टीची सविस्तर माहिती घेणार आहोत.
1) महाराष्ट्र पोलिस भरती अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप
2) महाराष्ट्र पोलीस भरती निवड प्रक्रिया
3) महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल लेखी परीक्षेच स्वरूप
4) महाराष्ट्र पोलीस परीक्षेचा दर्जा
5) महाराष्ट्र पोलीस मैदानी चाचणी
6) महाराष्ट्र पोलीस भरती अभ्यासक्रम
7) महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे महत्वाचे कागदपत्रांची यादी
महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप 2022
महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम 2022– इच्छुक उमेदवारांना महाराष्ट्र पोलीस विभागात (mahapolice.gov.in) पद मिळण्याची संधी आहे. लाखो उमेदवारांनी या प्रतिष्ठित नोकरीसाठी अर्ज करणार आहेत, यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन आणि परीक्षेची माहिती आवश्यक आहे जेणेकरून त्यांना त्यांच्या स्वप्नातील नोकरी मिळू शकेल. या लेखात आम्ही तुम्हाला सर्व नवीनतम महाराष्ट्र पोलीस भरती अभ्यास साहित्य, नवीनतम महा पोलीस परीक्षा पेपर PDF, महाराष्ट्र पोलीस भरती 2022 वयोमर्यादा, महाराष्ट्र पोलीस भरती 2022 शारीरिक चाचणी तपशील, याविषयी सर्व काही जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत या पेजवर रहा:
This Year, The Physical Test Will Be Conducted First…!
महाराष्ट्र पोलीस भरती 2022 अभ्यासक्रम आणि परीक्षेचा नमुना तपशील आणि PDF लिंक खाली दिल्या आहेत. या वर्षी लेखी परीक्षा प्रथम घेतली जाईल, त्यामुळे तुम्ही सराव पेपर तसेच महा पोलिस कॉन्स्टेबल भरती 2022 अभ्यासक्रमावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. लेखी परीक्षेनंतर शारीरिक चाचणी घेतली जाईल, यासाठी महाराष्ट्र पोलीस भरती शारीरिक चाचणी तपशील पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेला आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस भरतीने तुमच्या संदर्भ आणि परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्र पोलीस अभ्यासक्रम २०२२ प्रसिद्ध केला आहे. ज्या अर्जदारांनी ऑनलाईन फॉर्म सबमिट केला आहे आणि महा पोलीस अभ्यासक्रम PDF मराठीत शोधत आहेत, ते महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल परीक्षा पॅटर्न 2022 येथे पाहू शकतात. आम्ही महा पोलीस परीक्षा पॅटर्न 2022, MH पोलीस भरती 2022 अभ्यासक्रम, परीक्षा पॅटर्न, महा पोलीस मागील वर्षाच्या सोडवलेल्या प्रश्नपत्रिका, महाराष्ट्र पोलीस शिपाई 2021 प्रश्नपत्रिका (पोलीस भरती प्रश्नपत्रिका २०२१) आणि इतर महत्वाचे तपशील प्रदान केले आहेत. त्यामुळे तुम्ही महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती पोलीस भरती 2022 अभ्यासक्रम डाउनलोड संदर्भात महत्वाची माहिती घेऊ शकता.
NCC Certificate New GR – New GR Regarding Police Shipai Bharti has been Published by Maharashtra Home Department. The candidates possessing National Cadet Corps (NCC) “C” certificate shall be eligible for five bonus marks.
MAHA Police Constable new syllabus PDF downloads are given here. Candidates can also download the MAHA Police Constable Syllabus 2022 in PDF & print for your examination studies.
पोलीस भारती 2022 साठी निवड प्रक्रिया : –
या वर्षी 2022 मध्ये महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रियेचे दोन टप्पे आहेत, म्हणजे लेखी परीक्षा आणि शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET) आणि शारीरिक मानक चाचणी (PST). महाराष्ट्र पोलीस भारती 2022 साठी परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे.
OLD Update – पोलीस शिपाई पदासाठी आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची प्रथम लेखी परिक्षा ऑफलाईन पध्दतीने घेण्यात येईल. लेखी परिक्षेसाठी देण्यात आलेल्या प्रवेशपत्रामध्ये नमुद केलेल्या दिनांकास परिक्षा सुरु होण्यापुर्वी परिक्षा केंद्रावर किमान दोन तास आधी उपस्थीत राहावे लागेल. सदरहु लेखी परिक्षा होण्यासाठी खुल्या प्रवगातील उमेदवारांस ३५ टक्के व मागासप्रवर्गातील उमेदवारास ३३ टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.
1) The written test will be carried for 100 objective-type questions which should be completed within 90 minutes. (100 वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठी लेखी परीक्षा घेतली जाईल जी 90 मिनिटांत पूर्ण करावी लागेल)
2) The PST and PST round will be worth 50 marks and the applicants must score at least 50% in the test to be eligible for the further selection process. (PST आणि PST फेरी 50 गुणांची असेल आणि पुढील निवड प्रक्रियेसाठी पात्र होण्यासाठी अर्जदारांनी परीक्षेत किमान 50% गुण मिळवणे आवश्यक आहे.)
3) Candidates who are applying from Gadchiroli District have to Go through Three Stages:
4) CBT 1
5) CBT 2
6) 100 Marks Oral Test
7) Written Exam Test On Madiya Language
लेखी चाचणीचा कालावधी ९० मिनिटांचा असेल व मराठी भाषेत घेण्यात येईल. सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरुपाचे राहतील. चुकीच्या उत्तरास गुण कपात करण्यात येणार नाहीत. (Negative Mark सिस्टीम असणार नाहीत.)
महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल लेखी परीक्षेच स्वरूप:-
Maharashtra Police Exam Pattern 2022 Details New Syllabus
विषय | एकूण प्रश्न | एकूण गुण | कालावधी |
---|---|---|---|
गणित | 25 प्रश्न | 25 गुण | 90 मिनिटे |
बौद्धिक चाचणी | 25 प्रश्न | 25 गुण | |
मराठी व्याकरण | 25 प्रश्न | 25 गुण | |
सामान्य ज्ञान /चालू घडामोडी | 25 प्रश्न | 25 गुण | |
एकूण | 100 प्रश्न | 100 गुण |
Note: बाकी सर्व जिल्ह्यात पेपर 1 होणार आहे पेपर 2 फक्त गडचीरोली विभागासाठीच आहे. इतर जिल्ह्यात पेपर 2 होणार नाही.
Police Bharti 2022 Written Exam Paper 2 (Paper 2 is Only For Gadchiroli District)
विषयाचे नाव | एकूण प्रश्न | एकूण गुण | कालावधी |
---|---|---|---|
गोंडी भाषेच्या शब्दकोशाचे ज्ञान | 25 प्रश्न | 25 गुण | 90 मिनिटे |
वाक्यरचना/भाषांतर (गोंडी भाषा-मराठी भाषा)) | 25 प्रश्न | 25 गुण | |
गोंडी माडिया भाषेच्या शब्दकोशाचे ज्ञान | 25 प्रश्न | 25 गुण | |
वाक्यरचना/भाषांतर (गोंडी माडिया - मराठी ) | 25 प्रश्न | 25 गुण |
महाराष्ट्र पोलिस भरती 2022 साठी परीक्षेचा सविस्तर अभ्यासक्रम (Maharashtra Police Constable Syllabus) खालीलप्रमाणे आहे. सोबतच प्रत्येक विषयासाठी महत्वाचे घटक (Important Topics) सुद्धा खालील तक्त्यात देण्यात आले आहे.
विषय | महत्वाचे घटक |
---|---|
गणित | संख्या ज्ञान,संख्याचे प्रकार, मसावी-लसावी,दशांश अपूर्णांक, वर्गमूळ,घनमूळ,गुणोत्तर प्रमाण,पदावली,काळ-काम-वेग,सरळव्याज,चाक्रव्याज,नफा-तोटा,वयवारी,बेरीज,वजाबाकी,व्यवहारी अपूर्णांक,घातांक,सरासरी,शेकडेवारी,भिमितीय संकल्पना, |
बौद्धिक | क्रमबद्ध मालिका,संख्या संचातील अंक शोधणे,समान संबंध किंवा परस्पर संबंध, आकृत्यामधील अंक शोधणे, वेन आकृती, कालमापन(दिनदर्शिका),रांगेवर आधारित [प्रश्न,सांकेतिक लिपी/भाषा,विसंगत पद ओळखणे,विधाने व अनुमाने,आकृतीची आरशातील प्रतिमा,आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब, दिशा व अंतर,घड्याळ, नाते संबंध ओळख,निरीक्षण व |
मराठी व्याकरण | मराठी व्याकरण (वाक्य रचना, शब्दार्थ,प्रयोग,समास,समानार्थी शब्द,विरुद्धार्थी शब्द,म्हणी,व वाक्प्रचार वाक्यात उपयोग, शब्दसंग्रह,समूहदर्शक शब्द,प्राणीव त्यांची घरे,ध्वनिदर्शक शब्द,प्राणी व त्यांची पिल्ले, प्रसिद्ध पुस्तके आणि |
सामान्य ज्ञान आणि चालू | इतिहास, भुगो,भारतीय राज्यघटना, सामान्य विज्ञान,चालू घडामोडी,माहिती व तंत्रज्ञान (संगणकाशी संबधित प्रश्न) आणि इतर जनरल |
परीक्षेचा दर्जा –2022
1) प्रश्नपत्रिकेचा दर्जा मराठी विषयासाठी माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता 10वी) च्या दर्जाच्या समान.
2) परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही.
3) परीक्षा ही मराठीमध्ये होणार आहे.
4) परीक्षेचा एकूण कालावधी दीड तास आहे.
मैदानी चाचणी (Physical Test)
पुरुषांसाठी मैदानी चाचणी | ||
---|---|---|
A | 1600 मी. धावणे | 30 गुण |
B | 100 मी धावणे | 10 गुण |
C | गोळा फेक | 10 गुण |
एकूण गुण | 50 गुण |
महिलांसाठी मैदानी चाचणी | ||
---|---|---|
A | 800 मी. धावणे | 30 गुण |
B | 100 मी धावणे | 10 गुण |
C | गोळा फेक(4 K.g) | 10 गुण |
एकूण गुण | 50 गुण |
सामान्य विज्ञान:-
विविध शास्त्रे व त्यांचे अभ्यास विषय
शास्त्रीय उपकरणे व त्यांचा वापर
शोध व त्याचे जनक
शास्त्रीय उपकरणे व त्यांचे कार्य
गणित:-
संख्या व संख्याचे प्रकार
बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकर
कसोट्या
पूर्णाक व त्याचे प्रकार
अपूर्णांक व त्याचे प्रकार
म.सा.वी आणि ल.सा.वी.
वर्ग व वर्गमूळ
घन व घनमूळ
शेकडेवारी
भागीदारी
गुणोत्तर व प्रमाण
सरासरी
काळ, काम, वेग
दशमान पद्धती
नफा-तोटा
सरळव्याज व चक्रवाढ व्याज
घड्याळावर आधारित प्रश्न
घातांक व त्याचे नियम
क्रीडा:-
खेळ व खेळाशी संबंधित चषक
प्रमुख देश व त्यांचे राष्ट्रीय खेळ
खेळ व खेळाडूंची संख्या
खेळाचे मैदान व ठिकाण
खेळसंबंधी चिन्हे व प्रतीके
महत्वाच्या स्पर्धा व ठिकाणे
आशियाई स्पर्धा
राष्ट्रकुल स्पर्धा
क्रिकेट स्पर्धा
पंचायतराज:-
ग्रामप्रशासन
समिती व शिफारसी
घटनादुरूस्ती
ग्रामसभा व ग्रामपंचायत
ग्रामसेवक
पंचायत समिती
जिल्हा परिषद
मुख्य कार्यकारी अधिकारी CEO
गटविकास अधिकारी BDO
नगरपरिषद / नगरपालिका
महानगरपालिका
ग्रामीण मुलकी व पोलिस प्रशासन
सामान्य ज्ञान:-
विकास योजना –
संपूर्ण विकास योजना
पुरस्कार –
महाराष्ट्रचे पुरस्कार
राष्ट्रीय पुरस्कार
शौर्य पुरस्कार
खेळासंबधी पुरस्कार
आंतरराष्ट्रीय पुरस्कार
इतिहास – History
1857 चा उठाव
भारताचे व्हाईसरॉय
समाजसुधारक
राष्ट्रीय सभा
भारतीय स्वतंत्र लढा
ऑगस्ट घोषणा व वैयक्तिक सत्याग्रहाची चळवळ
1909 कायदा
1919 कायदा
1935 कायदा
हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी
बुद्धिमत्ता चाचणी:-
संख्या मालिका
अक्षर मालिका
व्हेन आकृत्यावर आधारित प्रश्न
सांकेतिक भाषा
सांकेतिक लिपि
दिशावर आधारित प्रश्न
नाते संबध
घड्याळावर आधारित प्रश्न
तर्कावर आधारित प्रश्न
मराठी:-
समानार्थी शब्द
विरुद्धर्थी शब्द
अलंकारिक शब्द
लिंग
वचन
संधि
मराठी वर्णमाला
नाम
सर्वनाम
विशेषण
क्रियापद
काळ
प्रयोग
समास
वाक्प्रचार
म्हणी
List Of Documents For Maharashtra Police Bharti Exam:
उमेदवारांना प्रमाणपत्राबाबत विशेष सुचना : List Of Documents For Maharashtra Police Bharti Exam
खालील नमुद केल्यानुसार प्रमाणपत्रे व साक्षांकित केलेल्या प्रमाणपत्रांच्या प्रती कागदपत्र पडताळणीच्या वेळी उमेदवारांनी सादर करणे आवश्यक राहील.
शाळा सोडल्याचा दाखला / १० वी चे प्रमाणपत्र.
जन्म दाखला.
१२ वी शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र गुणपत्रक.
अधिवास (डोमेसाईल) प्रमाणपत्र.
संबंधित जात प्रवर्गाचा दावा करणाऱ्या उमेदवारांनी संबंधित प्रवर्गाचे विधीग्राह्य जात प्रमाणपत्र व उन्नत व प्रगत गटात (नॉन क्रिमिलेयर) मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र (अ.जा./अ.ज. वगळून).
समांतर आरक्षण (पोलीस पाल्य/माजी सैनिक/अशंकालीन/भुकंपग्रस्त/होमगार्ड / खेळाडू / प्रकल्पग्रस्त / ३०% महिला आरक्षण/अनाथ इ.) मागणी केली असल्यास त्याबद्दलचे विधीग्राह्य प्रमाणपत्र.
आधारकार्ड (ऐच्छीक).
प्रमाणपत्रांच्या छाननीच्या वेळी लागू असलेल्या प्रमाणपत्रांची मूळ (Original) व सुस्पष्ट दिसतील अशा साक्षांकित केलेल्या दोन छायांकित प्रती उमेदवाराने कार्यालयास सादर करणे आवश्यक आहे.
उमेदवाराने प्रमाणपत्र मिळण्याकरिता सादर केलेल्या अर्जाच्या पावत्या ग्राह्य धरल्या जाणार नाहीत.
मूळ प्रमाणपत्रे उपलब्ध नसल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल.
जात वैधता प्रमाणपत्र वगळून इतर सर्व आवश्यक ती प्रमाणपत्रे ही कागदपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक राहील.
उमेदवाराने पोलीस भरतीकरिता येताना या कार्यालयाकडुन निर्गमीत केलेले पोलीस भरती प्रवेशपत्र सोबत आणावे
उमेदवाराने पोलीस भरतीकरिता येतांना त्यांनी सादर केलेल्या आवेदन अर्जाची (रजिस्ट्रेशन आयडी नमूद असलेली) प्रत प्रवेशपत्रांच्या (Admit card) २ प्रती तसेच, अलिकडील काढलेले ५ पासपोर्ट साईज फोटो (आवेदन अर्ज भरतांना सादर केलेले) इत्यादी न चुकता आणावे.
उमेदवार मागासवर्गीय असूनही खुला प्रवर्ग (Unreserved) म्हणून अर्ज सादर करतात. परंतु कागदपत्र पडताळणीच्या वेळी जातीचे प्रमाणपत्र / नॉन क्रिमेलिअर प्रमाणपत्र सादर करुन मागास प्रवर्गाचे लाभ मिळण्याबाबत अर्ज सादर करतात.
यास्तव आवेदन अर्ज सादर करण्यापूर्वीच (संबंधीत पोलीस घटकाच्या आस्थापनेवर त्या मागास प्रवर्गासाठी पदे रिक्त असल्याबाबत खात्री करुन) त्यांनी कोणत्या प्रवर्गातून अर्ज भरावयाचा आहे हे निश्चित करुन नंतरच आवेदन अर्जात तशी माहिती नोंद करावी व संबंधित प्रवर्गाचा निर्विवाद दावा अर्ज भरताना करावा. नंतर प्रवर्ग बदलण्याबाबत उमेदवारांकडून अभिवेदन अथवा दावा / तक्रार विचारात घेतली जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
कागदपत्र पडताळणीदरम्यान सादर करण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रावर संपूर्ण नाव, आवश्यक प्रमाणपत्राचा निर्गमित दिनांक, जात प्रमाणपत्र असल्यास जात व जातीचे वर्गीकरण [SC, ST, OBC, VJ-A (DT-A), NT-B, NT-C, NT-D, SBC & EWS] स्पष्टपणे नमूद असणे आवश्यक आहेत.
जातीचे प्रमाणपत्र व नॉन क्रिमेलियर प्रमाणपत्र विहित नमुन्यातील असावे.
आरक्षणाचा लाभ मिळण्यासाठी मागासवर्गीय उमेदवारांना सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले स्वतंत्र जात प्रमाणपत्र व स्वतंत्र नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र (अ.जा. व अ.ज. प्रवर्ग वगळून) देणे बंधनकारक आहे.
सदर प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर न करणाऱ्या उमेदवारास जात प्रवर्गाचा / समांतर आरक्षणाचा लाभ मिळू शकणार नाही
आवेदन अर्जात दावा केल्यानुसार कागदपत्रे पडताळणीच्या वेळी योग्य कागदपत्रे नसल्यास उमेदवारास गुणवत्तेनुसार सर्वसाधारण मध्ये समाविष्ट करण्यात येईल. सेवाप्रवेश नियमांमधील सर्व अर्टीची व आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पुर्तता करणारे उमेदवार पुढील आवश्यक त्या चाचणीसाठी पात्र राहतील.
कागदपत्र पडताळणीच्या वेळी उमेदवाराने, त्यांनी सादर केलेल्या आवेदन अर्जाची (रजिस्ट्रेशन आयडी नमूद असलेली) प्रत, __ पोलीस भरती प्रवेशपत्राची (हॉल तिकिटाची) प्रिंट व आवेदन अर्जावर सादर केलेले ५ पासपोर्ट साईज अलीकडील फोटो सोबत आणणे आवश्यक आहे.
आवेदनामध्ये नमूद वैध कालावधीची सर्व प्रमाणपत्रे उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे. सदर प्रमाणपत्रावरील उमेदवाराचे स्वत:चे नांव, जात प्रवर्ग, निर्गमित दिनांक, सक्षम प्राधिकाराची स्वाक्षरी व शिक्का इ. बरोबर असल्याची खात्री उमेदवारांने स्वत: करावी. विहित केलेली आवश्यक ती प्रमाणपत्रे त्रुटी, अपूर्ण अथवा अवैध असल्याचे आढळल्यास भरती प्रक्रियेतून कोणत्याही टप्प्यावर बाद करण्यात येईल व त्याबाबत कोणताही दावा / तक्रार करण्यास उमेदवारास कोणताही हक्क राहणार नाही.