पोलीस भरती लवकरच होणार! 17,130 पदांची पोलीस भरती ! Police Bharti 2022
17,130 पदांची पोलीस भरती:
अखेर नुकतेच महाराष्ट्र पोलीस भरतीबाबत नवीन अपडेट समोर आले आहे. ताज्या अपडेटनुसार, महाराष्ट्र पोलीस भरती ऑनलाइन अर्ज लवकरच सुरू होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनो, या मेगा पोलीस भरतीसाठी अर्ज करण्यासाठी तुमच्या सर्व कागदपत्रांसह तयार राहा. पोलीस शिपाई पदांची संख्या 14956 आहे आणि पोलीस ड्रायव्हरसाठी 2174 पदे भरली जातील. हा तात्पुरता डेटा आहे, परंतु जाहिरात जारी होताच आम्ही हे अद्यतनित करू. त्यामुळे या पेजशी कनेक्ट रहा.
नवीन अपडेट ०१ नोव्हेंबर २०२२ : महाराष्ट्र पोलिसांमध्ये 18,500 रिक्त पदे भरण्यासाठी 9 नोव्हेंबर पासून भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे कारण त्याच्या मार्गातील सर्व अडथळे दूर झाले आहेत, अशी माहिती संजय कुमार, महासंचालक (डीजी), प्रशिक्षण आणि विशेष दल, महाराष्ट्र यांनी आज नागपूर येथे दिली. तसेच पोलीस भरती २०२२ साठी लागणारी महत्वाचे डॉक्युमेंट्स तयार या लिंक वर दिलेली आहेत.
दोन वर्षांनी वयोमर्यादा वाढणार:
कोरोनामुळे दोन वर्षात पोलिसांसह अन्य शासकीय नोकर भरती राबवता आली नाही. त्यामुळे राज्यातील हजारो तरुणांची वयोमर्यादा संपुष्टात आल्याने त्यांना आता त्यात सहभागी होता येणार नाही. त्यासंबधीची असंख्य निवेदने सरकारकडे आली आहेत. या पार्श्वभूमीवर आता पोलीस भरतीसाठी वयोमर्यादा दोन ते तीन वर्षांनी वाढणार आहे. त्या संबधीचा निर्णय मंगळवारी (ता.१) मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार आहे. राज्यात पोलिसांची १४९५६जागांची एकाचवेळी भरती होणार होती परतू,कोरोना काळात व त्यापूर्वी राज्यात शासकीय नोकरभरती झाली नाही. नोव्हेंबर अखेरीस ही प्रक्रिया सुरु होणार आहे.
काही महत्वाच्या भरती
पोलीस भरती २०२२
तलाठी भरती २०२२
पोलीस भरतीबद्दल सर्वकाही
नवीन पोलीस भरती पुढे ढकलल्याचा GR सध्या सोशल मीडियावर व्हायरल:
नवीन पोलीस भरती पुढे ढकलल्याचा GR सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या बातमीनुसार सध्या पोलीस भरती सुरु होण्याची तारीख १० ते १५ दिवस पुढे ढकलली जाऊ शकते, आपल्याला माहीतच आहे मागील तीन वर्षांमध्ये पोलीस भरती झालेली नव्हती. वयोमर्यादा संपल्यामुळे अनेकजन पोलीस भरतीसाठी पात्र नाहीत. अशा तरुणांना संधी मिळावी, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये. त्यामुळे वयोमर्यादा मध्ये शिथिलता देण्याच्या दृष्टीने ही पोलीस भरती थोड्या कालावधीसाठी स्थगित करण्यात आल्याचं समिती आणि सरकारकडून कळतेय. त्यामुळे पुढील आठवड्यात पोलीस भरतीची जाहिरात निघाल्यानंतर वयोमर्यादा शिथिल करण्यात येऊ शकते. परंतु या संदर्भातील अधिकृत अपडेट् अजून यायचा आहे. नवीन अपडेट आल्यावर आम्ही महाभरती वर प्रकाशित करूच. तसेच उमेदवारांनी आपला संयम सोडू नये आणि आपला अभ्यास आणि भरतीची तयारी सुरु ठेवावी !!
पोलीस भरती बाबत इतर महत्वाची माहिती:
पदाचे नाव: पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक
पद संख्या: 21,764 जागा (जवळपास)
शैक्षणिक पात्रता: 12th Pass (मूळ जाहिरात वाचावी)
नोकरी ठिकाण: महाराष्ट्र
वयोमर्यादा:
खुला वर्ग: 18 ते 28 वर्षे
मागासवर्गीय: 18 ते 33 वर्षे
अर्ज शुल्क:
खुला प्रवर्ग: रु. 450 /-
मागास प्रवर्ग: रु. 350 /-
अर्ज पद्धती: ऑनलाइन
अर्ज सुरु होण्याची तारीख: नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात
अर्ज करण्याची शेवटची तारीख: लवकरच अपडेट करण्यात येईल.
अधिकृत वेबसाईट: www.mahapolice.gov.in
भरतीबाबत GR व जाहिरात:
पोलीस भरतीसाठी ऑनलाईन अर्ज नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सुरु होईल. या संदर्भातील अधिकृत वेबसाईटवर GR आणि माहिती अजून यायची आहे. अधिकृत माहिती आल्यावर आम्ही पुढील अपडेट या ब्लॉगवर प्रकाशित करूच. तेव्हा पुन्हा भेट देत रहा.