आजच्या या पोस्टमध्ये आपण पासपोर्टसाठी 1) अर्ज कसा करावा 2) पासपोर्ट काढण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे 3) पासपोर्ट कार्यालयात जाऊन काय करावे लागते 4) पासपोर्ट काढण्यासाठी किती पैसे लागतात? अशी संपूर्ण अर्ज प्रक्रिया या विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
Passport Information in Marathi
जर तुम्हाला विदेशात प्रवास करावयाचा असल्यास पासपोर्ट हा अत्यंत महत्त्वाचा दस्त्येवज असतो. व्हिसा काढायचा असल्यास पासपोर्ट हा अत्यंत महत्त्वाचा आहे. पासपोर्ट नसल्यास व्हिसा सुद्धा मिळत नाही. आपल्या पैकी बऱ्याच जणांना पासपोर्ट काय आहे? पासपोर्ट कसा काढायचा? या विषयी माहिती नसते. पासपोर्ट काढण्याची प्रोसेस अत्यंत सोपी आहे. तुम्ही अगदी सहजतेने स्वतःचा पासपोर्ट बनवू शकतात.
1) पासपोर्टसाठी अर्ज कसा करावा? How to Apply for a Passport?
Passport साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी खालील प्रमाणे प्रक्रिया पूर्ण करावी
१) पासपोर्ट साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी पासपोर्ट सेवेच्या Official वेबसाईट ला भेट द्या..
२) आता तुम्हाला या ठिकाणी सर्वप्रथम नोंदणी करायची आहे, त्यासाठी तेथे दिलेल्या रकान्यात विचारलेली सर्व माहिती अचूक भरून नोंदणी करून घ्या.
३) आता तुमच्या समोर अर्ज भरण्याची प्रक्रिया ही सुरू होईल. या ठिकाणी सर्वप्रथम अर्जदाराचे नाव, अर्जदाराचा मोबाइल नंबर, ईमेल आयडी, जन्मतारीख आणि जवळच्या पासपोर्ट कार्यालयाची माहिती
इथे व्यवस्थित रित्या भरा.
४) आता पुढे तुमच्या समोर नवीन पासपोर्ट/ नूतनीकरण असे दोन पर्याय दिसतील. जर तुम्हाला नवीन पासपोर्ट काढायचा असल्यास नवीन पासपोर्ट वर क्लिक करा
५) आता संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे भरल्या नंतर सबमिट बटनावर क्लिक करा.
६) आता तुम्ही भरलेली सर्व माहिती अचूक आहे की नाही ते चेक करा.
७) माहिती अचूक असल्यास पेमेंट ऑप्शन वर क्लिक करून पेमेंट करून घ्या.
८) आता ऑनलाईन पद्धतीने पेमेंट केल्या नंतर तुम्हाला अपॉइंटमेंट बुक करावी लागते. तिथे प्रत्यक्षात जावे लागते त्यासाठी तुमच्या निवडी नुसार तारीख आणि वेळ ही निवडून घ्या
९) आता तुम्हाला पासपोर्ट कार्यालयात जाऊन पुढील प्रोसेस करावी लागते. तुमच्या अर्जाची प्रिंट घेऊन तुम्हाला पासपोर्ट कार्यालयात जावे लागते.
2) पासपोर्ट काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:
पासपोर्ट काढण्यासाठी खालील कागदपत्रे सादर करावी लागतात.
१) निवासी पत्ता – Adhar Card, टेलिफोन बिल (लँडलाईन किंवा पोस्टपेड मोबाइल बिल), वीज बिल, बँक पासबुक, मतदान कार्ड,घर टॅक्स पावती, लहान मुलांच्या पासपोर्टसाठी पालकांचा पासपोर्ट (पहिले आणि शेवटचे पान), LPG Gas Connection Card, Income Tax Certificate, Adhar Card,
२) जन्म पुरावा – बर्थ सर्टिफिकेट, टीसी, बोर्ड सर्टिफिकेट, आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स
पासपोर्ट साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केल्या नंतर तुम्हाला प्रत्यक्ष पासपोर्ट कार्यालयात जाऊन भेट देऊन पुढील प्रक्रिया पूर्ण करावी लागते.
3) पासपोर्ट कार्यालयात जाऊन काय करावे लागते?
पासपोर्ट काढण्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर आता पुढील प्रक्रिया म्हणजे पासपोर्ट कार्यालयात जाऊन प्रत्यक्ष भेट देऊन पुढील प्रक्रिया पूर्ण करणे होय.
१) ज्या दिवशी तुम्ही पासपोर्ट कार्यालयाची अपॉइंटमेंट बुक केलेली असते त्या दिवशी पासपोर्ट कार्यालयात जावे लागते.
२) पासपोर्टसाठी अर्ज करताना भरलेल्या फॉर्म ची पावती दाखवल्यानंतर तुम्हाला पासपोर्ट कार्यालयात प्रवेश दिला जातो.
३) आता पासपोर्ट कार्यालयात तुमची सर्व प्राथमिक कागदपत्रे तपासली जाते व त्यानंतर तुम्हाला टोकन नंबर दिला जातो. त्यानंतर तुमचा नंबर लागल्यानंतर तुम्हाला सर्व ओरिजनल कागदपत्रे तसेच झेरॉक्स सादर करावी लागते.
४) आता तुमच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाते त्यानंतर तुमची सर्व कागदपत्रे व्यवस्थित असल्यानंतर तुमचे संगणकीकृत छायाचित्र घेतले जाते. तसेच तुमच्या बोटांची ठसे घेतली जातात.
५) आता तुमचा पासपोर्ट चा अर्ज पासपोर्ट कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविला जातो.
६) वरिष्ठ अधिकारी तुमच्या पासपोर्ट अर्जाची पडताळणी करतात आणि च्या अर्जावर सही करतात त्यानंतर तुमचा अर्ज हा शेवटची स्टेप म्हणजे पोलीस वेरिफिकेशन साठी पाठवला जातो.
७) त्यानंतर अर्ज पोलिसांकडे गेल्यानंतर पोलीस फोन करून घरी चौकशीला येतात. नंतर पासपोर्ट अर्ज हा पोलिसांच्या शिफारशीने पासपोर्ट कार्यालयात परत पाठविला जातो.
त्यानंतर सर्व गोष्टी क्लिअर झाल्यानंतर १०-१५ दिवसात तुमचा पासपोर्ट तुमच्या घरी पोस्टाने पाठविला जातो.
4) पासपोर्ट काढण्यासाठी किती पैसे लागतात?
पासपोर्ट काढण्यासाठी तुम्हाला १५०० रुपये ४००० रुपये पर्यंत खर्च येऊ शकतो. पासपोर्ट साठी लागणारे पैसे पासपोर्टचा प्रकार, वय, पाने आणि किंमत यांच्यावर अवलंबून असतात, जसे की नवीन / नूतनीकरण पंधरा वर्ष व पाने ही ६० असल्यास फी ही २५०० तसेच तत्काळ वर्ष १५ आणि पाने ६० असल्यास फी ही ४००० रुपये असते.
मित्रांनो, आता पासपोर्ट काढण्यासाठी पूर्वी प्रमाणे किचकट प्रक्रिया नाही. ही प्रक्रिया अत्यंत सोपी करण्यात आलेली आहे. त्यामुळे अगदी सर्व सामान्य व्यक्ती सुद्धा पासपोर्ट करिता अर्ज करू शकतो. आणि पासपोर्ट मिळवू शकतो. पासपोर्ट हे एक महत्त्वपूर्ण असे ओळखीचे प्रमाणपत्रसुद्धा आहे. तसेच पासपोर्ट verification करण्यासाठी तुम्हाला जास्त लांब जायची गरज नाही. जवळच सेंटर उपलब्ध असतात. Passport Information
in Marathi
अशा पद्धतीने तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पासपोर्टसाठी अर्ज करून पासपोर्ट काढू शकतात.
जर तुम्हाला ही माहिती आवडली
असल्यास तुमच्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा.