जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर याच्या मदतीने तुम्ही अवघ्या १० मिनिटांमध्ये नवीन पॅन कार्ड बनवू शकता. यासाठी तुमचा मोबाइल नंबर तुमच्या आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे.
पॅन कार्ड सध्या महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. इनकम टॅक्सद्वारे जारी केले जात असलेले हे कागदपत्र अनेक महत्त्वाच्या कामासाठी वापरले जाते. बँक अकाउंट उघडण्यापासून ते इनकम टॅक्स रिटर्नपर्यंत सर्व ठिकाणी याचा उपयोग होतो. मोठ्या व्यवहारांसाठी देखील पॅन कार्ड आवश्यक आहे. ज्याप्रमाणे आधार कार्ड उपयोगी आहे, त्याच प्रमाणे पॅन कार्ड असणे देखील आवश्यक आहे. जर तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल तर त्वरित बनवायला हवे.
पॅन कार्ड बनवणे खूपच सोपे झाले आहे. तुम्ही पॅन कार्ड घरबसल्या स्वतः बनवू शकता व अगदी काही मिनिटांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण होईल. पॅन कार्डला ऑनलाइन प्रक्रियेद्वारे सहज बनवता येईल. ऑनलाइन पॅन कार्डसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे हे जाणून घेऊयात.
यूनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) द्वारे आधार कार्ड जारी केले जाते. तर इनकम टॅक्स डिपार्टमेंटकडून पॅन कार्ड जारी केले जाते. तुम्ही पॅन कार्डसाठी अर्ज केल्यास अवघ्या १० मिनिटात पॅन कार्ड मिळू शकेल. हे पॅनकार्ड पीडीएफ(PDF) फॉर्मेटमध्ये मोफत उपलब्ध होईल.
मोफत घरबसल्या पॅन कार्ड बनवण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा
1) पॅन कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम इनकम टॅक्स डिपार्टमेंटच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
लिंक 👉Income Tax Department (अधिकृत वेबसाईट)
2) यानंतर तुम्हाला क्विक लिंक्स सेक्शनमध्ये जावे लागेल. येथे इंस्टेंट पॅन थ्रू आधार (Instant E-PAN) असा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
पॅन कार्डला डाउनलोड करण्यासाठी तुम्ही चेक स्टेट्स/डाउनलोड पॅनमध्ये जाऊन आधार नंबर टाकून पीडीएफ फॉर्मेटमध्ये डाउनलोड करू शकतात. पॅन कार्ड तुम्हाला पीडीएफ स्वरूपात ईमेलवर देखील येईल. यासाठी तुमचा ईमेल आधारसोबत लिंक असणे आवश्यक आहे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेखा / बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि GRAMMAR GURUJI ला फॉलो करा.