Letter Writing पत्र लेखन
Letter writing is an important and compulsory topic for class 10th and 12th exams. Earlier the format of letter writing was different. Now the format of letter writing has changed to some extent. Earlier the address of the Sender was written on the right side. Now it is changed and write on the left side.
पत्र लेखन (Letter Writing) हा टॉपिक इ. १० वी व १२ वी च्या परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा आणि अनिवार्य असा टॉपिक आहे. पूर्वी पत्र लेखनाचे स्वरूप वेगळे होते. आता काही प्रमाणात पत्र लेखनाचे स्वरूप बदलले आहे. पूर्वी पत्र लिहिणार्याचा पत्ता उजव्या बाजूला लिहिला जात असे. आता त्यात बदल करून डाव्या बाजूला लिहितात.
2 Types of Letter Writing (पत्र लेखनाचे दोन प्रकार आहेत)
१) Formal Letter ( औपचारिक पत्र )
2) Informal Letter ( अनौपचारिक पत्र )
औपचारिक पत्र (Formal Letter) लिहिताना बाळगायची दक्षता :
- पत्राची सुरुवात करताना वरच्या डाव्या कोपऱ्यात दिनांक लिहावा.
- प्रति यांचे नाव दिलेले असल्यास, तेच लिहावे. तसेच हुद्दाही लिहावा. यांचीही सुरुवात डावीकडे करावी.
- प्रति यांचा पत्ता जर प्रश्नपत्रिकेत दिलेला असेल, तर तोच लिहावा; पत्ता दिलेला नसेल, तर तो काल्पनिक लिहावा.
- प्रति यांचा पत्ता लिहिल्यानंतर पत्राचा विषय लिहावा.
- विषयानंतरच्या ओळीत आवश्यकतेप्रमाणे 'Sir / Madam,' (महोदय’/’महोदया’) हे संबोधन लिहावे आणि स्वल्पविराम दयावा.
- त्यानंतरच्या ओळीत मजकुराला सुरुवात करावी. यातील प्रत्येक परिच्छेदाची सुरुवात डावीकडे करावी.
- 'Your Faithfully‘ / 'Your Sincerely' (आपला विश्वासू’, ‘आपला कृपाभिलाषी’) या किंवा यांसारख्या शब्दांनी शेवट करून त्याखाली प्रश्नात प्रेषकाचे नाव आणि पत्ता दिलेला असल्यास तो लिहावा. प्रेषकाचे नाव दिलेले नसल्यास XYZ अ. ब. क. असे नाव लिहून, काल्पनिक पत्ता लिहावा. हे तपशीलही डावीकडे लिहावेत.
- पत्त्यानंतर पत्रलेखकाने स्वत:चा e-mail id लिहावा.
Tricks for Writing a Letter:
ज्यांना पत्र लेखन (Letter Writing) हे एक मोठे संकट आहे यांच्यासाठी एक Trick.
अनौपचारिक पत्र लिहितांना बर्याच विद्यार्थ्यांना अडचणी येतात. पत्र लेखन (Letter Writing) म्हणजे त्यांच्या पुढे मोठे संकट उभे राहते.
आता 'नो टेंशन'. पत्र लिहिण्यासाठी काही महत्वाचे वाक्य खाली दिलेले आहेत. हे तुम्ही प्रत्येक पत्रात लिहू शकतात. जसे भावास पत्र, बहिणीस पत्र, मित्रास पत्र, काकास पत्र, मामास पत्र,आईस पत्र, इत्यादी अनौपचारिक पत्रात पुढील वाक्य लिहून पत्र पूर्ण करू शकतात आणि हमखास मार्क्स मिळवू शकता. वाक्य संपल्यानंतर शेवटी एक Sample Letter दिलेले आहे. तुम्हाला फक्त एक विनंती आहे ही पोस्ट तुम्हाला आवडली तर गरजूंना नक्की शेअर करा.
पत्राचा आरंभ ( Initial) :-
1) I received your letter yesterday.
मी कालच तुझे पत्र स्वीकारले.
2) Your letter has reached me today.
तुझे पत्र मला आज मिळाले.
3)I received your letter yesterday and was delighted to read
it.
मी तुझे पत्र कालच स्वीकारले आणि वाचुन खूप आनंद
झाला.
4) I hope you and mummy are in the best of health.
तुझी व आईची तब्बेत चांगली आहे अशी अशा
बाळगतो/बाळगते.
5) How are you? I am absolutely fine.
तुम्ही कसे आहात? मी अगदी आनंदात आहे.
पत्राचा मध्य (Center) :-
6) Mother is very keen to see you.
आई तुला पाहण्यास खूप उत्सुक आहे.
7) Please, take out some time from your busy schedule and came
down here for a few days.
कृपया, तुझ्या व्यस्त दिनचार्येतून थोडा वेळ
काढून काही दिवसांसाठी इकडे येवून जा.
8) I eagerly await for your return.
मी तुझी परत येण्याची आतुरतेने वाट पाहत आहे.
9) I have been very regular with my studies.
मी
माझा अभ्यास नियमित करतो.10) I am very regular with my studies and hope to do well in
the forth-coming exams.
मी माझा अभ्यास नियमित करतो आणि येणाऱ्या परीक्षेत देखील चांगला अभ्यास करेल अशी आशा बाळगतो.
मी माझा अभ्यास नियमित करतो आणि येणाऱ्या परीक्षेत देखील चांगला अभ्यास करेल अशी आशा बाळगतो.
पत्राचा शेवट (End) :-
11) I promise to write regularly in future.
मी तुला भविष्यात नेहमी पत्र लिहीन असे वचन देतो.
मी तुला भविष्यात नेहमी पत्र लिहीन असे वचन देतो.
12) Hope to hear from you soon.
तुझ्याकडची आनंदाची बातमी लवकर ऐकण्यास मिळेल
अशी आशा बाळगतो.
13) We are missing a lot.
आम्हाला
तुझी खूप आठवण येते.14) I miss you a lot.
मला तुझी खूप आठवण येते.
15) Take care with love.
काळजी
घे.16) My regards to loving mother and cute sister Ragini.
माझ्या प्रेमळ आईस व लाडक्या बहिणीस (रागिणी)
माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा.
17) Our blessings are always with you.
आमच्या
शुभेच्छा सदैव तुझ्या पाठीशी राहतील.