शिकू आनंदे निपुण कृती पुस्तिका इयत्ता पहिली | निपुण भारत अभियान-२०२२
'निपुण भारत अभियान'ची पार्श्वभुमी काय आहे?
तब्बल 34 वर्षानंतर आपल्या देशात 'नवीन शैक्षणिक धोरण २०२०' जाहीर करण्यात आले आहे.इस्रोचे माजी प्रमुख के. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या धोरणाचा मसुदा तयार केला आहे.या धोरणातील तरतुदीनुसार तीन ते १४ वर्ष वयोगटाचे विद्यार्थी शिक्षण हक्क कायद्याच्या कक्षेत आले आहेत. यापूर्वी हा वयोगट ६ ते १४ वर्षे होता. शालेय शिक्षणाची रचना आता 5+3+3+4 अशी झालेली आहे. वरील शिक्षणाच्या नवीन सूत्रानुसार आपल्या लक्षात आलेच असेल आता अंगणवाडी ही प्राथमिक शिक्षणाला जोडली गेली आहे. वयोगट ३ ते ८ मधील शिक्षण हे मूलभूत शिक्षण समजले जाईल आणि त्यासाठी बालसुलभ शिक्षण आणि अभ्यासक्रम विकसीत केला जाईल.
'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सन २०२०' नुसार, प्राथमिक स्तरावर सन २०२६-२७ पर्यंत मुलभूत भाषिक व गणितीय कौशल्य प्राप्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. यात प्राथमिक पातळीवरील अनेक विद्यार्थ्यांनी अद्याप मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त केले नाही, असे ठळकपणे नमूद आहे. वय वर्षे ३ ते ९ वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांना 'मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान' प्राप्त करण्यासाठी त्वरीत एक राष्ट्रीय अभियान राबवून त्याची राज्यामध्ये अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. सदर अभियानात विद्यार्थी, पालक, शाळा, शिक्षक व समाज या सर्वांनी सर्वंकष पुढाकार घेऊन राज्यातील सर्व विद्यार्थ्यांच्या भावी शिक्षणाचा पाया मजबूत करणे गरजेचे आहे. यासाठीच भारत सरकारने "समग्र शिक्षा" अंतर्गत 'निपुण भारत मिशन' योजना आखली.
कृती पुस्तिका इयत्ता पहिली | निपुण भारत अभियान-२०२२
Workbook 'Shiku Anande Marathi' Class 1 st under Nipun Bharat Abhiyan: PDF
निपुण भारत अभियान व समग्र शिक्षा अंतर्गत विकसित कृतिपुस्तिका.
'शिकू आनंदे मराठी'
(इयत्ता पहिली)
लिंक खाली दिलेली आहे
राज्यातील मराठी माध्यमाच्या इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मराठी विषयाचे अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षक बंधु-भगिनींनी कृपया या पुस्तिका आवश्य वाचा. आपल्या इतर शिक्षक बंधु-भगिनींना ही पुस्तिका पुढे फॉरवर्ड करा.
राज्यातील मराठी माध्यमाच्या इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मराठी विषयाचे अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षक बंधु-भगिनींनी कृपया या पुस्तिका आवश्य वाचा. आपल्या इतर शिक्षक बंधु-भगिनींना ही पुस्तिका पुढे फॉरवर्ड करा.
इयत्ता | डाऊनलोड Links |
---|---|
शिकू आनंदे मराठी: विद्यार्थी कार्यपुस्तिका : इयत्ता पहिली | 📑कृती पुस्तिका डाऊनलोड |