महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात विविध जिल्ह्यात भरती....
MAHA Security Recruitment 2022: महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामध्ये (Maharashtra State Security Corporation) विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. निवड झालेल्या उमेदवारांना मुंबईत नोकरी करावी लागणार आहे.
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, आस्थापनेवर राज्यातील विविध ठिकाणी सेवानिवृत सहा. पोलिस आयुक्त (ACP) दर्जाचे ९ अधिकारी संचालक आणि सह संचालक ( Director & Jt. Director /SSO ) या पदावर, पीस निरीक्षक (PI) दर्जाचे ३४ अधिकारी आणि सहा. पोलिस निरीक्षक /पोलिस उप निरीक्षक (API/PSI) दर्जाचे ०३ अधिकारी सुरक्षा पर्यवेक्षकीय अधिकारी (SSO) या पदावर अशा एकूण ४६पदासाठी प्रस्तुत जाहिरात देण्यात येत असून इच्छुक व पात्र उमेदवारांनी महामंडळाच्या खालील नमूद पत्त्यावर अर्ज सादर करावेत
पर्सनल असिस्टंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षण संस्थेतून ग्रॅज्युएशन पूर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवारांकडे उत्तम संवाद कौशल्य असावे. यासोबतच त्याच्याकडे कॉम्प्युटर, टायपिंग आणि स्थानिक भाषांचे ज्ञान असणाऱ्या उमेदवारांना नोकरीत प्राधान्य देण्यात येणार आहे.
उमेदवाराकडे मराठी टायपिंग ३० शब्द प्रति मिनिट, इंग्रजीमध्ये ४० शब्द प्रति मिनिट, शॉर्टहॅण्ड (इंग्रजी आणि मराठी) ८० शब्द प्रति मिनिट इतका वेग असावा. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा २५ हजार रुपये पगार दिला जाणार आहे.
पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे.
या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे.
उमेदवारांनी आपले अर्ज empanelment.mssc@gmail.com येथे पाठवायचे आहेत. २० एप्रिल २०२२ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.
पदाचे नाव- सहसंचालक, संचालक, आर्मरर, सहाय्यक संचालक
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
रिक्त पदे- 46 पदे
नोकरी ठिकाण- मुंबई, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, अमरावती , नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, कोल्हापूर, मिरज, नांदेड, पुणे, रायगड, ठाणे, सोलापूर, सांगली
अर्ज करण्याचा पत्ता- पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई. सेंटर 1, 32 मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई 400005
अर्ज करण्याचा इमेल पत्ता empanelment.mssc@gmail.com
अंतिम तारीख- 16 सप्टेंबर 2022
अधिकृत वेबसाईट- www.mahasecurity.gov.in
डाऊनलोड PDF- जाहिरात