"एसटी महामंडळाने पाच हजार कंत्राटी चालक भरती करण्याचा
निर्णय घेतला आहे. त्याची निविदा प्रक्रियाही राबवली जात आहे. हे चालक
टप्याटप्प्यात सेवेत येतील आणि गरज असेल त्याप्रमाणे त्यांची भरती होणार आहे. त्याची निविदा प्रक्रियाही राबवली जात आहे. हे चालक
टप्याटप्प्यात सेवेत येतील आणि गरज असेल त्याप्रमाणे त्यांची भरती होणार. 💬.....शेखर चन्ने (एसटी महामंडळ व्यवस्थापकीय संचालक)
MSRTC Conductor Bharti
2022: एसटीमध्ये
सुमारे पाच हजार चालकांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा निर्णय महामंडळाने
घेतला आह़े याबाबत दोन दिवसांत जाहिरात काढण्यात येणार आह़े
शासनामध्ये
विलीनीकरणाच्या मागणीसाठी झालेल्या संपादरम्यान चालकांविना एसटी
प्रवाशांचे हाल झाले होते. एसटी महामंडळाने कंत्राटी चालक भरती करून एसटी सुरळीत
ठेवण्याचा प्रयत्न केला. संप मिटताच कंत्राटी चालकांची संख्या कमी केली. तसेच मुदत
संपलेल्या काहींना मुदतवाढही देण्यात आली. त्यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, लातूर, बीड, जालना, उस्मानाबाद या
विभागांचा समावेश आहे.
आता पुन्हा एसटी महामंडळाने पाच हजार कंत्राटी
चालकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात एसटीचे २९ हजारांपेक्षा जास्त
चालक आहेत. काही चालक अन्य विभागांत बदली झाल्यानंतर तीन ते पाच वर्षांनंतर पुन्हा
आपल्या मूळ भागात बदली करून घेतात. त्यामुळे आधी बदली झालेल्या ठिकाणी मनुष्यबळाची
कमतरता भासते. चालकांअभावी एसटी गाडय़ाही आगारात उभ्या राहतात. परिणामी प्रवाशांचे
हाल होतात. कोकण विभाग, पुणे
विभागासह अन्य काही विभागांत ही समस्या असून, त्यातून मार्ग
काढण्यासाठी एसटी महामंडळाकडून ही कंत्राटी चालकभरती करण्यात येणार आहे.
प्रतीक्षा यादीवरील
उमेदवारांबाबत लवकरच निर्णय
एसटीत
प्रतीक्षा यादीवरील दोन हजारांहून अधिक उमेदवार असून, त्यातील बहुसंख्य
चालक- वाहक आहेत. दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधी उलटूनही त्यांना अद्यापही सेवेत
घेण्याचा निर्णय झालेला नाही. ‘‘प्रतीक्षा यादीवर असलेले कर्मचारी हे कायमस्वरूपी
कर्मचारी म्हणून एसटीत येऊ शकतात. एसटीत निवृत्त कर्मचारी संख्या वाढल्यास त्यांची
भरती होईल. याबाबत लवकरच निर्णय होणार आहे’’, असे महामंडळाचे
व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने म्हणाले.
पाच हजार कंत्राटी चालकांची खासगी कंपनीमार्फत भरती करण्यात येईल़ ही भरती टप्प्याटप्प्याने होईल़ याबाबतची जाहिरात दोन-तीन दिवसांत काढण्यात येईल़.
एसटी महामंडळाची चालक-वाहक सरळसेवा नोकरभरती अपडेट्स
1. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने चालक-वाहक सरळसेवा नोकरभरती २०१९ मध्ये जाहीर केली होती. या भरतीच्या माध्यमातून उमेदवारांची लेखी परीक्षा, कागदपत्रे छाननी, तसेच त्यानंतर संगणकीकृत चाचणी व वैद्यकीय तपासणी केली. मात्र, भरती झालेली नाही. २४०० चालक- वाहक या भरतीकडे डोळे लावून बसले आहेत.
2. उमेदवारांनी ५० गुणांची तळेगाव या ठिकाणी लेखी परीक्षा दिली होती. त्यानंतर, भोसरीतील एसटी वाहन कार्यशाळेत २५ गुणांची संगणकीकृत चाचणी व वैद्यकीय तपासणी २५ गुणांची झाली. संगणकीकृत चाचणी होऊनही परिवहन महामंडळ संगणकीकृत चाचणी राहिल्याचे कारण देत आहे.
3. टेस्टिंग ट्रॅक हा संगणकीकृत आहे. त्याचे काम बाकी आहे. कोरोनामुळे ते रद्द केले होते. सध्या ट्रॅक दुरुस्तीचे काम सुरु आहे. अद्याप भरतीसाठी किती दिवस लागतील, सांगता येणार नाही.
5. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बसेस जागेवरच उभ्या असल्याने महामंडळाने बससेवा सुरळीत करण्यासाठी सुरूवातीला ९८ चालकांची भरती केली. यामुळे काही प्रमाणात बसेस रस्त्यावर आल्या. तर आता पुन्हा जळगाव विभागात दीडशे कंत्राटी चालकांची भरती करण्यात येणार आहे. ही भरती झाल्यानंतर महामंडळातर्फे ग्रामीण भागातीलहीं सेवा सुरू करण्याचे नियोजन असून यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.